Download Our Marathi News App
मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेलहून सुटणाऱ्या ठाणे येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंतच्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
वाशी/बेलापूर/पनवेलसाठी CSMT/वडाळा रोडवरून सकाळी 11.04 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगावसाठी सकाळी 10.48 ते 4.43 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
हे पण वाचा
पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा
सकाळी १०.०७ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटीसाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. रविवारी मेनलाइनवर मेगाब्लॉक असणार नाही.
अंधेरी-बोरिवली दरम्यान जंबो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक असेल. CPIO सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन दिशेच्या सर्व जलद गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. तसेच बोरिवलीच्या काही धिम्या गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.