Download Our Marathi News App
मुंबई : कुर्ल्यात चोरट्यांचा वावर वाढत आहे. घरातून दोन लाख रुपयांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
कुर्ला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र होवळे यांनी सांगितले की, कुर्ला (प.) येथील रामजीव चाळ येथे राहणाऱ्या भक्ती रोहनचे कुटुंब 6 फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते घरी परत आले असता घराचे कुलूप तुटलेले असून कपाटात ठेवलेले दागिने व मौल्यवान वस्तू गायब होत्या. भक्ती रोहन यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
हे पण वाचा
सीसीटीव्हीवरून सापडला आरोपींचा सुगावा
पोलिसांनी घटनेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता एका सीसीटीव्हीमध्ये संशयित दिसले. पोलिसांनी तपासाअंती चार आरोपींना अटक केली आहे. गोवंडी येथील मोहम्मद इजाज मोहम्मद रशीद शेख, किरण किसन चव्हाण, मोहम्मद अमजद अब्दुल है शेख आणि मोहम्मद सोहेल उमर अशी त्यांची नावे आहेत.