व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपला टक्कर देण्यासाठी भारत सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. केंद्र सरकारकडून आज संदेस हे भारतीय मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘संदेस अॅप’बाबतची लेखी स्वरुपात माहिती संसदेत सादर केली.
पूर्णपणे भारतात विकसीत करण्यात आलेलं संदेस अॅप फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅप या इन्स्टंट मेसेजिंग अॅपला एक उत्तम पर्याय ठरणार आहे. व्हॉट्सअॅपच्याच कार्यपद्धतीप्रमाणेच संदेस अॅप देखील काम करणार आहे. त्यामुळे युजर्सला अॅप वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. संदेस अॅप हे सध्या सरकारी कर्मचारी आणि सरकारशी निगडीत इतर कंपन्यांचे कर्मचारी प्रायोगिक तत्वावर वापर करत असल्याचीही माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
The post ‘संदेस’ अॅपचं लॉन्चिंग! appeared first on Lokshahi News.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.