स्मार्टफोन ब्रँड पोकोने भारतात नवा स्मार्टफोन Poco F3 जीटी लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत.
यामध्ये टॉप-एंड परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोन ब्रँड पोकोने भारतात नवा स्मार्टफोन पोको एफ3 जीटी लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. टॉप-एंड परफॉर्मन्ससाठी Dimension 1200 Chipset प्रोसेसर देण्यात आला आहे.हा स्मार्टफोन तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला असून 6जीबी+128जीबी, 8जीबी+128जीबी आणि 8जीबी+256जीबी याची किंमत अनुक्रमे 25 हजार 999 रुपये 27 हजार 999 रुपये आणि 29 हजार 999 रुपये इतकी आहे.
हा स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस रिजोल्यूशन, 120HZ रिफ्रेश रेट आणि एचडीआर 10 प्लस सपोर्ट देण्यात आला आहे.त्याचबरोबर प्रोटेक्शनसाठी मागे आणि पुढे कॉनिर्ंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला असून सेल्फी कॅमेऱ्यासाठी वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नोच देण्यात आला आहे.
पोको एफ3 जीटीमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड एंगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पोको एफ3 जीटीमध्ये फ्लॅगशिप मीडियाटेक चिपसेट प्रोसेसरसह डायमेंशन 1200 चिपसेटदेखील आहे.दरम्यान, हा स्मार्टफोन 3.0 गीगाहट्सवर कार्यरत आहे. मल्टिटास्कींगसाठी हा फोन अतिशय उपयुक्त आहे. सिक्युरिटीसाठी यामध्ये फेस अनलॉक आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.