मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीमुळे गेले अनेक महिन्यांपासून सभागृह आणि सांस्कृतीक कार्यक्रम बंद होते. राज्यातील कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे त्यामुळे आता टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवनगी देण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे.

त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार आहे
काय आहे नियमावली?
- कार्यक्रमाला प्रवेशा देताना प्रेक्षकांचे तापमान बंधनकारक
- गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांकडे सुरक्षा व्यवस्था असावी
- कार्यक्रमाचे आयोजक, प्रेक्षक सर्वांना मास्क घालणे बंधनकारक
- बालकलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक
- बंदिस्त सभागृह 50% क्षमतेने सुरू करणार
- मात्र कोविडच्या नियमांचं पालन कराव लागणार आहे
- सभागृहातील एसी 24 ते 30 अंश सेल्सिअस मर्यादित असली पाहिजे
- मोकळ्या जागेतील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम
- प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नाही
- कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
- कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, पेये विक्रीस बंदी
- कार्यक्रमांच्या वेळी सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे
- मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी दोन व्यक्ती मधील अंतर सहा फूट असावे
- सहभागी होणाऱ्या कलाकारांचे दोन ही डोस होणं महत्वाचे
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.