स्टोरीटेल अॅपवर नवनवीन ग्रंथ,कादंबरी,आत्मचरित्र आपल्याला ऐकायला मिळतात. आता स्टोरीटेल अॅपवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य वाचायला मिळणार आहेत.नुकतेच स्टोरीटेलने ‘द अल्केमिस्ट’ कादंबरीचे ऑडिओबुक प्रदर्शित केले आहे. शब्दांचे किमयागार जगविख्यात ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांनी लिहीली आहे.’द अल्केमिस्ट’ ही वैश्विक पातळीवर प्रचंड गाजलेली बहुचर्चित कादंबरी आहे.याचे मराठी रूपांतर लेखिका डॉ. शुचिता नांदापूरकर – फडके यांनी केले आहे.
‘द अलकेमिस्ट’ शब्दांचे किमयागार म्हणून जगविख्यात झालेले ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची सर्वाधिक वाचक लाभलेली ही कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिली गेलेली, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गाजलेली आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’ने आपल्या साहित्यप्रेमींसाठी खास ‘फ्रीडम मंथ’ निमित्ताने उपलब्ध केली आहे. जागतिक विक्रम स्थापन करणारं दर्जेदार साहित्य आपल्या मातृभाषेत ऑडिओबुकद्वारे उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा ‘स्वातंत्र्य अमृतमहोत्सव’ स्टोरीटेल साजरं करीत आहे.
स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा जगप्रसिद्ध साहित्यिक ‘पाउलो कोएलो’ यांच्या लेखणीतून उतरली आहे.’कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,’ असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ‘द अलकेमिस्ट’ ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. ‘स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक’मध्ये संदीप कर्णिक यांच्या बहारदार आवाजात ऐकताना साहित्यरसिक गुरफटून जातात.
स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले, “या महिन्यात आपण अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य उत्सव साजरे करीत असताना स्टोरीटेलही आपल्या मातृभाषेत स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागविणारे विपुल साहित्य आणि त्यासोबत आंतरराष्ट्रीय साहित्यकृतीही आपल्या मातृभाषेतील ‘ऑडिओबुक’मध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध करून साहित्यउत्सव साजरा करीत आहे. ऑडिओबुक्स कोणीही, कुठेही आणि केव्हाही ऐकू शकतात. ‘फ्रीडम मंथ सेलिब्रेशन’ निमित्त अत्यंत माफक दरात साहित्यरसिकांना स्टोरीटेलचे सदस्यत्व दिले जात आहे.
Read LaterAdd to FavouritesAdd to Collection
Credits and Copyrights – lokshahinews.com