गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत नसून जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व राहाता तालुका हॉटस्पॉट ठरत असून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून राज्यातील तिसरी लाट अहमदनगर जिल्ह्यातून सुरू होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाल आहे. संगमनेर तालुक्यातील कोरोना आढावा वैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कडक उपाय योजना करण्याचे आदेश दिले. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भोसले यांनी कोरोना आटोक्यात आला नाही तर संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय राहील असा इशारा जिल्हावासीयांना दिलाय.ahmednagar lockdown
जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने या गावांमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २४ गावे ही संगमनेर तालुक्यातील आहेत.

#आज जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व राहाता तालुक्यातील 117 गावे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून या गावातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले असून जिल्ह्यातील होम आयसोलेशन पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले या सर्व उपाय योजना करूनही कोरोना आटोक्यात न आल्यास संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव उपाय असेल असा इशारा सुद्धा जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिलाय.
#जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने या गावांमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २४ गावे ही संगमनेर तालुक्यातील आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी जारी केला.
#जिल्ह्यातील सध्याची दैनंदिन रुग्णसंख्या ही ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे.
#जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
ज्या गावात २० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत, अशा गावांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर करणे, गावबंदी करणे, कोरोना नियमांचे पालन करणे, शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक होते. याबाबत गावातील संबंधित भागात निर्बंध लागू करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी कुठेच झाली नसल्याचे आढळून आले.
अशा आहेत उपाययाेजना
- ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ६१ गावांमधील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत.
- ज्या भागात जास्त रुग्ण आहेत, असे भाग कन्टेनमेंट झोन करणार.
- गावात कोणालाही येण्यास व जाण्यास प्रतिबंध.
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, वस्तू, विक्री, सेवा बंद. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासही मनाई.
- कृषी माल वगळता इतर वाहनांना गावात बंदी.
राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी होत असली तरी दुसरीकडे अहमनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढतच आहे.
यामुळे आता प्रशासनाने आक्रमक पाऊले उचलली आहे. नुकतेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे,तिसगाव मधील सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने १३ ऑक्टोबरपर्यंत तिसगाव येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.तसेच जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे तिसगावचाही त्यात समावेश आहे.या आदेशाने गावातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिसगावसह परिसरातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे.ahmednagar lockdown