कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळामध्ये पुण्यात अनुचित प्रकार टाळण्याकरिता सात हजार पोलीस (Seven thousand police ) तैनात केले जाणार आहेत. या काळामध्ये पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असेही आवाहन आता पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Dr. Ravindra Shiswe) यांनी केले आहे. पोलिसांमार्फत पुण्यामध्ये गणेशोत्सवाकरिता यापूर्वी आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. त्याप्रमाणे यंदा श्रींच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेशोत्सवाकरिता बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, सातशे अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाडविरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल. गणेशोत्सवामध्ये गुन्हे घडू नयेत याकरिता वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. उत्सव कालावधीमधील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाणार आहे.
पुण्यामध्ये जमावबंदी जारी
गणेशोत्सवाच्या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, याकरिता पुण्यामध्ये जमावबंदी जारी करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
यंदा दीड लाख मोदकांचे बुकिंग
येत्या १० तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यामध्ये दीड लाख मोदकांचे बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यंदा ग्राहकांमार्फत फ्रोझन मोदक व तळणीच्या मोदकांकरिता मागणी वाढली आहे. फक्त पुण्यामधूनच नव्हे, तर पुण्याबाहेरूनही मोदकांकरिता ऑर्डर आल्या आहेत.
गणेश मंडळांच्या या मागण्या
पुण्यातील गणेश मंडळांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांतल्या ५ जणांना स्थिर वादन करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबत उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरामध्ये जाहिरात कमान टाकण्याची मुभा द्यावी. तसेच २०१६ साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप मुभा द्यावी, या मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.