स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : नैसर्गिक संकटे, उत्पादनात घट आणि यामधून नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. शेती व्यवसयात प्रगती होत असली तरी वाढत्या आत्महत्या या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीआरबी च्या अहवालानुसार 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 18% वाढ झाली आहे. यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. शेती व्यवसयासाठी सरकारी योजना, विविध बाबतींमध्ये सवलती असे असताना देखील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. एकट्या महाराष्ट्रात 4006 आत्महत्या ह्या झालेल्या आहेत. त्यामुळे 2019 नंतर 2020 मध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रच दुर्दैवाने आघाडीवर आहे.
सर्व सरकारी प्रयत्नानंतरही देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात असे वाटत नाही. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्यांच्या घटनांमध्ये सुमारे 4 टक्क्यांनी वाढ आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर कर्नाटकातील कृषी क्षेत्रातील 2016 आंध्र प्रदेश 889, मध्य प्रदेश 735 आणि छत्तीसगड 537 लोकांनी आत्महत्या केली. २०१९ मध्येही ही राज्ये या प्रकरणात इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवरच होती.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.