मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तर, महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलाच टोला लगावलाय. अमृता यांनी ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तरही देण्याचं त्यांनी सूचवलं आहे. आज वसुली चालू आहे की बंद, कोणी मला अपटेड देईल का.. असे म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.