नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 निमित्त, निरोगी जीवनशैलीसाठी आणि दैनंदिन दिनचर्येत योगाभ्यासाचा समावेश करण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने, महाराष्ट्र टपाल विभागाने एक विशेष लिफाफा आणि विशेष तिकीट जारी करण्यात आले.आज सर्वात मोठा दिवस असून सूर्याचे दक्षिणायन सुरु होते यावर देखील टपाल तिकीट संग्रह आणि विशेष तिकीट जारी करण्यात आले. यावेळी “वॉंडरिंग मिन्स्ट्रेल्स” वरील टपाल तिकीटाच्या अनोख्या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
टपाल तिकीट संग्राहकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि ,महाराष्ट्र विभागांमध्ये टपाल तिकीट संग्रह प्रकाशन आणि टपाल तिकीट संग्राहक क्लब सुरु करण्यासाठी भविष्यातील धोरण आखण्याबाबत महाराष्ट्र विभागाच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास यांच्या उपस्थितीत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नव्या टपाल तिकीट संग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये टपाल तिकीट संग्रहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी नाविन्यपूर्ण टपाल तिकीट संग्रह उत्पादनांच्या निर्मितीवर वीणा श्रीनिवास यांनी यावेळी भर दिला.