वर्धा : महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणा स्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे. आजकाल वैज्ञानिक पद्धत विकसित झाली आहे. साबरमती आश्रमाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली, पण त्याला स्थानिकांकडून विरोध झाल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.
यावेळी त्यांनी आश्रम प्रतिष्ठानच्या पदाधिकारी सोबत चर्चा करुन काही सूचना केल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सेवाग्राम आश्रमात येत बापुकुटीत गांधीजींना अभिवादन केले. त्यांनी महात्मा गांधींच्या आश्रमात प्रार्थना केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगून जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. जेवढा कालावधी उलटत आहे तेवढे त्यांना आठवल्या जात आहे. आज महात्मा गांधींची जयंती आहे मला वाटले की आपण सेवाग्रामचे दर्शन केले पाहिजे आणि इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रमप्रतिष्ठानच्या वतीने आश्रमप्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.