भारतीय संघाचं कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा महेंद्रसिंह धोनीनं कायमच क्रीडारसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. निवृत्तीनंतरही त्याची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. सध्या माही त्याच्या नव्या लुकमुळे प्रकाशझोतात आला आहे.
सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकिम यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून माहिचे काही फोटो शेअर केले. ‘हा पाहा माहिचा डॅशिंग लूक. त्याचा हेअरकट (haircut) आणि बिअर्ड करताना मजा आली….’, असं आलिम हकिमनं लिहित माहिला नव्या रुपात आणण्याचा आनंद व्यक्त केला.
माहिचा हा नवा लूक पाहून क्रीडारसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्य म्हणजे हा लूक त्याला अतिशय सुरेख पद्धतीनं शोभून दिसत आहे. त्याच्या या नव्या लूकवरुन पडदा उठताच सोशल मीडियावर धोनीच्या नावाचा ट्रेंड पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच माहिनं त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला.
The post माहीचा नवा लुक appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com