सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. (Manike Mage Hithe Song singer Name) गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर (Instagram) एक गाणं प्रचंड व्हायरल होत असून, त्यावर अनेकजण रिल्स (reels) देखील बनवत आहेत. मानिके मागे हिथे (Manike Mage Hithe) असे या गाण्याचे बोल असून, फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर फेसबुक, ट्विटरसह संपूर्ण सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा रंगत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे यूट्यूबवरदेखील हे गाणे ट्रेडिंग (Trending) मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
योहानीला श्रीलंकेत या नावाने ओळखले जाते ( Manike Mage Hithe Song singer Name)
Manike Mage Hithe हे गाणे एका मुलीने गायले असून, तिचे नाव योहानी (yohani) असे आहे. योहानी हे गाणे गातानाचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल होत आहेत. योहानीच्या या गाण्याची सध्या प्रचंड चर्चा आहे की, चक्क बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही यावर एक व्हिडीओ बनवला आहे.
तिचे हे व्हिडीओ पाहून योहानी (yohani) ही दाक्षिणात्य असल्याचा अंदाज बऱ्याच जणांनी वर्तवला होता, परंतु ती मूळची श्रीलंकेची आहे. योहानीने गायलेले हे गाणे तमीळ अथवा मल्ल्याळम् भाषेमधील नसून सिंहली (Sinhala) भाषेत आहे. काही महिन्यांनी तिची गाणी, रॅप याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. योहानीचे संपूर्ण नाव योहानी दिलोका डिसिल्वा असे असून, तिने २०१६ मध्ये यूट्यूबर म्हणून करिअर सुरू केले. तिचा जन्म ३० जुलै १९९३ मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाला. योहानीला श्रीलंकेत ‘रॅप प्रिन्सेस’ (Rap Princess) या नावाने ओळखले जाते.
योहानीचे हे गाणे या दोन भाषांत डब होणार
योहानी शालेय जीवनामध्ये एक उत्कृष्ट जलतरणपटू व पोलो खेळाडू होती. त्यानंतर पुढील शिक्षणाकरिता ती इंग्लंडला गेली. योहानीने इंग्लंडला उच्च शिक्षण पूर्ण केले. लॉजिस्टिक मॅनेजमेंट (Logistics Management) व प्रोफेशनल अकाऊंटिंगची पदवी घेतली, परंतु त्यानंतर तिने संगीत क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. योहानीचे जे गाणे सोशल मीडियावर व्हायरल (social media) होत आहे ते मे महिन्यात रिलीज झाले असून, तिचा या गाण्याचा व्हिडीओ जगभरामध्ये लोकप्रिय ठरला आहे. हे गाणे आतापर्यंत आठ कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
Manike Mage Hithe हे गाणे तमीळ व मल्ल्याळम् भाषेतदेखील डब करण्यात आले आहे. २६ जुलैला या गाण्याचे व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.