कॉमेडियन सुनील पाल सध्या त्याच्या कॉमेडी पेक्षा त्याच्या वक्तव्यांमुळे फारच चर्चेत आहे. सुरुवातीला डॉक्टर्स वर केलेली टीका तर आता अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यावरील टीका यामुळे सुनील पाल फारच चर्चेत आहे.
अश्लील चित्रफीत राज कुंद्रा प्रकरणात आपला मत मांडताना सुनील पालने वाजपेयींना खालच्या पातळीचा माणूस तसेच बदमाश अशी टीका केली होती. त्यावर आता मनोज यांनी चांगला समाचार घेतला आहे. बाजपेयींनी सल्ला देत सुनील पालची बोलती बंद केली आहे.
दरम्यान पॉर्नोग्रफी केस मध्ये सुनील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी डिजिटल स्पेस वर सेन्सॉरशिप नसल्याने याचा फायदा घेतला जात असल्याचं सांगितलं होतं. सुनील पाल म्हणाले ओटीटीवरील कंटेंट हा कुटुंबासाठी नाही. पुढे ते म्हणाले, “मनोज वाजपेयी कितीही मोठा अभिनेता असेल, कितीही पुरस्कार मिळाले असतील पण त्याच्या इतका बदमाश आणि खालच्या पातळीचा अभिनेता मी आजवर पहिला नाहीं.”
सुनील पालच्या या वक्त्याव्यावर एका वर्तमानपात्राशी बोलताना “मी समजू शकतो लोकांकडे काम नाही. मी अशा स्थितीत राहिलो आहे. अशा परिस्थितीत लोकांनी मेडीटेशन करायला हवं.” असे मत मनोज वाजपेयी यांची मांडले.
Credits and Copyrights – lokshahinews.com