मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर आता दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळ सिरीजमध्ये ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर आता ‘मीमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत,या पोस्टमध्ये दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत फोटोमध्ये दिसत आहे. ‘नवरसा’ या सिरीजचे दिग्दर्शन आणि निर्मिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मनिरात्नम यांनी केले आहे.या सिरीजमध्ये दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार दिसणार आहेत.
९ जुलै रोजी नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टचा टीझर प्रदर्शित केला होता. या टीझरमध्ये सूर्या, सिद्धार्थ, प्रकाश राज, विजय सेतुपति, रेवती, ऐश्वर्या राजेश आणि बरेच कलाकार दिसले. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधून होणारी कमाई मनोरंजन विश्वातील गरजू तंत्रज्ञ मंडळीना दिली जाणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com