राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आयोजित औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपा नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख करुन सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. या कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थितीत होते. राज्याच्या राजकारणात यामुळे चर्चांना उधाण आलं असून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं असता त्यांनी रावसाहेब दानवे यांना टोला लागवला आहे. रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी फिरकी घेतली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर?”, असं त्यांनी म्हटलं आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.