नवी दिल्ली : महागाईविरुद्ध काँग्रेस देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत अंतिम टप्प्यात नवी दिल्लीत महारॅली आयोजित करणार आहे.( Mehengai Hatao Rally )१२ डिसेंबर रोजी एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असताना दुसरीकडे काँग्रेसची दिल्लीत महारॅली निघणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे संघटन प्रभारी महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली.
संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. Mehengai Hatao Rally By Cogress.

स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.