अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा म्हटले आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना मेस्सीला अश्रूही अनावर झाले होते. हा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते, मी क्लब सोडण्याचा विचारही केला नव्हता, असे मेस्सीने भाषणात म्हटले.
माध्यमांशी बोलताना मेस्सी म्हणाला, क्लबसोबत चांगला आणि वाईट दोन्ही काळ पाहिला. पण लोकांचे प्रेम कायम राहिले. मला आशा आहे, की मी परत येईन आणि या क्लबचा एक भाग होऊ शकेन. या क्लबला जगातील सर्वोत्तम क्लब बनवण्यासाठी मी काहीही करू शकतो. पण सध्या माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत. मी माझे मानधन ५० टक्क्यांनी कमी करण्याची ऑफर दिली होती, पण यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.”
क्लब सोडण्याबाबत मेस्सी म्हणाला, ”जेव्हा हे घडले तेव्हा जणू माझे रक्त थंड झाले. मी खरोखर दुःखी होतो. हे माझ्यासाठी अजूनही कठीण आहे आणि मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा मी घरी जाईन, तेव्हा मला आणखी वाईट वाटेल. मी या शहरात माझ्या तीन मुलांसोबत २१ वर्षे राहत होतो आणि येथील लोकांनी मला खूप प्रेम दिले. गेल्या वर्षी मला जायचे होते, पण या वर्षी नाही. मला हा क्लब सोडायचा नव्हता. मला हा क्लब आवडतो, पण आता माझी नवीन कथा सुरू होते.”
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.