बॉलीवूड अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असतो.आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मिलिंद रस्त्यावर धावत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मिलिंद पायी मुंबई ते गुजरात स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत यात्रा करणार आहे.
मिलिंद सोबत त्याची टीम देखील आहे. मिलिंदने मुंबईतील दादर या शहरातून अहमदाबादमध्ये असलेल्या सरदार पटेल यांच्या प्रतिमेपर्यंत जाणार आहे. सरदार पटेल यांची ही प्रतिमा स्टॅच्यू ऑफ यूनिटी या नावाने ओळखली जाते.
मिलिंदने प्रवास आठ दिवसांचा असणार आहे.त्याने हा प्रवास १५ ऑगस्ट रोजी सुरु केला होता.सध्या मिलिंद सोमन ५५ वर्षांचा आहे.तरुण मुलांनाही लाजवेल असा त्याचा उत्साह नेहमीच असतो.
Credits and Copyrights – lokshahinews.com