मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून करत असलेली कामं आणि त्यांचे वैयक्तिक विचार धनंजय मुंडे त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड करत असतात. त्यांच्या फेसबुक पेजचे लाखो फॉलोअर्स आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या फेसबुक पेजचा अॅडमिन अॅक्सेस काढून घेण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे. “माझे अधिकृत फेसबुक पेज हे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत फेसबुक आणि महाराष्ट्र सायबर सेलकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.