नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आजपासून (22 सप्टेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर राज ठाकरे मान्यतेचा ठसा उमटिवणार असल्याचे समजते. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षाचे तरुण नेतृत्व अमित ठाकरे बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी मंगळवारी राजगडावर शाखा अध्यक्षाच्या यादीवर शेवटचा हात फिरवला. यावेळी इच्छुकांशी संवाद साधला. या बैठकीसाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी उपस्थित होते.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.