मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट कसा झाला हे अद्याप कळू शकले नाही.स्थानीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरवणुकीदरम्यान मोठा स्फोट झाला. किमान तीन जण ठार झाले आहेत आणि 50 हून अधिक गंभीर जखमी आहेत.
यापूर्वी कराचीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. 15 ऑगस्टच्या संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी एका ट्रकवर हँड ग्रेनेडने हल्ला केल्याची माहिती आहे. अकरा जण ठार झाले. अनेक लोक जखमी झाले आहेत.