पुणे : जिल्ह्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुणे जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील स्मारके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व विभागाच्या स्मारकांचा समावेश आहे. परंतु वन विभागाच्या अखत्यारीतील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंदच राहणार आहे. दरम्यान, पर्यटकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शारीरिक अंतर राखण्यासोबतच मास्क परिधान करणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाच्या कार्यक्षेत्रातील स्मारके नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह इतर स्मारकांचा समावेश आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.