डोंबिवली/प्रतिनिधी – आज असणाऱ्या ‘जागतिक छायाचित्र दिना’चे औचित्य साधून मनसे आमदार राजू पाटील यांच्यातर्फे फोटोग्राफर्ससाठी मोफत कोवीड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. डोंबिवली पूर्वेतील सर्वेश सभागृहात आयोजित या शिबीरात कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, मुंबईतील अनेक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून समाजातील विविध गरजू व्यक्तींसाठी मोफत कोवीड लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, नाभिक आदी सर्वसामान्य वर्गातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर आज असणाऱ्या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आज फोटोग्राफर्ससाठी आज कोवीड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, मालाड आदी परिसरातील 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते.
या लसीकरणाबद्दल राज्य सरकारने अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करून लस घेतलेल्या फोटोग्राफर्सनी आनंद व्यक्त केला