मुंबई : ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ध्वजारोहण करण्यात येणार आहे तर मुंबई भाजपाच्यावतीने मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण मुंबईत ७५०० ठिकाणी तिरंगा फडकवला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य, मानसन्मान, प्रतिष्ठा, गौरव मिळावा यासाठी ज्या-ज्या लोकांनी आपले योगदान दिले, हालअपेष्टा सहन केल्या, बलिदान दिले, त्याग आणि तपस्येची पराकाष्ठा केली आहे त्यांच्यासाठी ही मानवंदना असणार आहे. मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा ध्वजारोहण कार्यक्रम सर्व जिल्हा, मंडळ, वॉर्ड स्तरावरील कार्यालयात साजरा करण्यात येईल. याचबरोबर शहराच्या मुख्य ठिकाणी देखील ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com