Download Our Marathi News App
मुंबई : गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मुंबईतील मस्जिद बंदर येथून ६६ लाख रुपयांच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ज्या कारमधून तो ई-सिगारेटचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत होता, त्या कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत पवार, पोलिस निरीक्षक सत्यजित तैटवाले, संदीप निगडे, समीर शेख, उपनिरीक्षक साळुंखे यांच्या पथकाने मस्जिद बंदर येथे नाकाबंदीदरम्यान एक संशयास्पद कार अडवली असता चालकाने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हे पण वाचा
डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. कारची झडती घेतली असता कारमधून 66 लाख रुपये किमतीचे ई-सिगारेटचे 10 बॉक्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-सिगारेटची तस्करी करताना पोलिसांनी त्याला अटक केली.