स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भूज,शेरशाह यांसारखे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले,दरम्यान अमेझॉन प्राईमने ही अशाच एका वेबसिरीजची घोषणा केली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेझॉन प्राईम व्हिडीओने ‘मुंबई डायरीज २६ /११’ च्या प्रीमियरची घोषणा केली आहे.ही वेबसिरीज ९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.निखील अडवाणी निर्मित एम्मे एंटरटेनमेंटच्या साह्याने ही वेबसिरीज निर्माण केली आहे.या वेबसिरिजचे दिग्दर्शन निखील अडवाणी आणि निखील गोंसाल्वेस यांनी केले आहे.
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुंबई डायरी २६ /११ मध्ये दिसून येणार आहे.त्याचबरोबर कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, आणि प्रकाश बेलावाड़ी सारख्या प्रतिभाशाली कलाकारांचे काम पाह्यला मिळणार आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडिक्स आणि हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांची संपूर्णपणे नवी कथा मांडण्यात येणार आहे, ज्यात 26 नोव्हेंबर, 2008ला शहरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात लोकांचा जीव वाचवण्याचे अथक प्रयत्न केले होते.
Credits and Copyrights – lokshahinews.com