मुंबई : मुंबईतील करी रोड येथे असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली असून ती हळूहळू वाढताना दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होती, तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. अविघ्न वन पार्कमधील १९ व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. तिनं आणखी काही मजले कवेत घेतले. १९ व्या मजल्यावर एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी बाल्कनीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात ती व्यक्ती खाली कोसळली. अरुण तिवारी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं वय ३० वर्षे होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.