मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यासंदर्भातल्या सूचना जारी केल्यात. त्यामुळे या वर्षी गरबा आणि दांडिया खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करावा लागणार आहे.
मुंबईतील नवरात्रोत्सवासाठी नियमावली
- नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित
- सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी नवरात्रोत्सव मंडळांना बृहन्मुंबई म.न.पा. ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे
- देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती मूर्तीकरिता 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
- पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. . घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
- घरगुती देवीमुर्तीचे आगमन / विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे.
- सार्वजनिक देवीमूर्तीच्या आगमनाच्यावेळी व विसर्जनाच्यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी लसीकरणचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.
- नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच, आरती भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- देवी मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मारक, रॉनीटायझर इत्यादी) पाळणे बंधनकारक राहिल.
- मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकिकरण करावे.
- नवरात्रोत्सवादरम्यान धार्मिक, भक्तीपर इ. गर्दी जमा होणा-या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.
- मंडपात एका वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी.
- देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेत
- नवरात्रोत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोन मध्ये असेल तर त्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.