मुंबई : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला झटका बसला. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. या निकालानंतर शिवसेना पालिका निवडणुकीला कशी सामोरे जाणार याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना महापालिका निवडणुकीवर भाष्य केलं आहे.
मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. शिवसेना मोठा पक्ष आहे. शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.