सिंधुदुर्ग : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका फेरीवाल्या कडून त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या हाताची बोटे कापली गेली. डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या घटनेचा राज्यभर निषेध नोंदवला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी नगर परिषद, मालवण नगरपरिषद तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना, मुंबई यांच्या वतीने आज जाहीर निषेध नोंदवत काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन छेडले. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. असेही यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगराध्यक्ष यांनाही कामबंद निषेध आंदोलना बाबत निवेदन देण्यात आले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.