झी मराठी वाहिनीवरील काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.त्याजागी नवीन मराठी मालिका भेटीस येत आहे.यातील एक मालिका म्हणजे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
झी मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसात तब्बल ४ नव्या मालिका प्रसारित होणार आहे.’माझी तुझी रेशीमगाठ’,’मन झालं बाजिंद’, ‘ती परत आलीये’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकांचा समावेश आहे.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अमृता पवार दिसणार आहे.या मालिकेचा जो प्रोमो रिलीज झाला आहे त्यामध्ये लिहिले आहे की, ‘तयारी स्पर्धा परीक्षेची नव्हे, तयारी संसाराची’ यावरून ही एखादी कौटुंबिक मालिका असावी, असा अंदाज बांधला जातोय.
ही नवीन मालिका ज्या वेळेवर प्रसारित होणार आहे, त्यावेळेत ‘माझा होशील ना’ ही मालिका प्रसारित केली जाते. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की त्याची वेळ बदलणार याबाबत प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com