नवी दिल्ली : कोकणात शिवसेनेला शह देण्याच्यादृष्टीने भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना बळ दिले जात आहे. केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नारायण राणे त्यादृष्टीने कामालाही लागले आहेत. नारायण राणे यांनी शनिवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडले. गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशा मागण्या नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव त्या पूर्ण करणार की नाही, हे पाहावे लागेल.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com