नाशिक : nashikonweb ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकमधील (Nashik Crime) सुरगाणा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या शहरात कलर प्रिंटिगचा बिझनेस बंद असल्याने येथे चक्क नकली नोटांचा छापखाना (Printing of Money) सुरु केला असल्याचे उघडकीस आले. यावर नाशिक पोलिसांना या छापखान्याचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी 7 जणांना अटक (7 arrested) केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव (Lasalgaon) जवळील विंचूरपर्यंत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे, आरोपींनी आतापर्यत लाखो नकली नोटा छापल्या आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.Nashik Crime
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामध्ये लॉकडाऊनमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिटिंगचा व्यवसायही बंद झाला. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी चक्क नोटांचा छापखाना सुरु केला. आहे. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. गेले 3 महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरु होते. विशेष म्हणजे नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनपणे केले जात होते. 3 महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात नकली नोटा आणल्या जात होत्या. पण, हा प्रकार समोर यायला अधिक वेळ लागला नाही. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना आमच्याकडे नकली नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. तसेच आरोपींच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला आहे.
दरम्यान, कारवाईत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) एकूण 7 जणांना अटक केली आहे.कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद असल्याने नकली नोटा छापण्याचं धाडस अटक केलेल्या लोकांनी केलं आहे.याशिवाय राजकीय व्यक्तीचा यात काही हस्तक्षेप आहे का? याचा देखील अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.Nashik Crime
Credits and copyrights – nashikonweb.com