अध्यक्ष राज ठाकरेनाशिक दौऱ्यावर (Raj Thackeray in Nashik) आहेत. मनसेच्या सुरुवातीपासूनच नाशिक खास राहिले आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी महापालिकेची सत्ता हातात दिली होती. राज ठाकरेंनी विविध कंपन्यांचा निधी आणून नाशिकमध्ये विकासही केला होता. परंतू, नंतरच्या निवडणुकीआधी मनसेचे नगरसेवक भाजपात गेल्याने तिथे भाजपाची सत्ता आली होती. यामुळे नाशिक पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्षात मोठा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ( MNS leaderhip change before Nashik Municipal Corporation elections.)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात पक्षाअंतर्गत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून दिलीप दातीर यांना हटवून त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
• सध्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करणारे रतनकुमार इचम यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
• नाशिक शहराध्यक्षपदी असलेले अंकुश पवार यांना बढोत्री देत त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जम्बाबदरी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यांची धुरा असणार आहे.
• आज झालेल्या नाशिक शहर नूतन शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात राज यांनी या दोन्ही पदांच्या घोषणा केल्या आहे. आगामी महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता मनसेत या मोठया पदांचे फेरबदल केले आहे.
आज झालेल्या नाशिक शहर नूतन शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात राज यांनी या दोन्ही पदांच्या घोषणा केल्या आहे. आगामी महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता मनसेत या मोठया पदांचे फेरबदल केले आहे.
• महापालिका निवडणुकीत मनसे ताकदीनिशी उतरणार असून शहरात मनसेला बळकट करण्यासाठी शाखाध्यक्षांच्या नेमनुका करण्यात आल्या आहे. त्याची घोषणा देखील राज ठाकरे यांनी केली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. यामुळे मनसेसह अन्य पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत. पदाधिकारी बदलले जात आहेत.
Credits and copyrights – nashikonweb.com