#NashikOnWeb #Nashik Nashik Murder CIDCO Hotel
हॉटेलमध्ये जेवणावरुन झालेल्या वादातून तीन ते चार जणांनी एका तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार घडला. प्रसाद भालेराव (वय २५, रा. उपनगर परिसर, नाशिक रोड) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना सिडकोमधील स्टेट बँकेजवळील सोनाली मटण भाकरी हॉटेलमध्ये रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये रात्री लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी हॉटेल उशिरापर्यंत उघडी असतात. प्रसाद भालेराव आणि काही जण तेथे जेवायला आले होते. जेवणावरुन त्याचे व इतर तीन ते चार जणांशी वाद झाला. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा हल्लेखोरांनी प्रसाद याच्यावर फरशीच्या तुकड्यांनी हल्ला केला.
फरशीचा तुकड्याचे घाव त्याच्या वर्मी लागल्याने जागेवर प्रसाद कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. प्रसादला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी,
सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी,
कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मारहाण करणार्यांपैकी दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
#नाशिक : हॉटेल सोनाली मटण भाकरी या हॉटेल मध्ये हत्या
– अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेवणाच्या वादावरून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज
– शेजारच्या टेबलावर बसलेल्या युवकांनी प्रसाद भालेराव नामक 25 वर्षीय युवकाची केली हत्या
– नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या इन्स्पेक्शन करण्यासाठी महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस महासंचालक नाशिक दौर्यावर असतांना घडली घटना
– फक्त पार्सल सेवा चालू असतांना बसून जेवत होते काही युवक बेकायदेशीर हॉटेल अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे हॉटेल सुरु
– केवळ एका हमीपत्रावर मोक्का सारख्या कायद्यातून गुन्हेगारांना सूट मिळत असल्याने पोलीस आयुक्तांच्या शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. Nashik Murder CIDCO Hotel
Credits – Stream7news.com