कालपासून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) आता नाशिक दौऱ्यावर असून, पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) हे राज ठाकरे यांच्या भेटीकरिता गेले. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तिथे जाऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेचे आदेश काढले होते. मनसे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये काल बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे राज ठाकरे यांना भेटण्याकरिता हॉटेल ssk वर दाखल झाले. पोलीस आयुक्त व राज ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच्या समोर मनसैनिकांनी होर्डिंग (mns hoarding) लावले होते. त्यावर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने (municipal administration) कारवाई करून मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. राज ठाकरे आज आपल्या नियोजित कार्यक्रमाकरिता जाण्यापूर्वीच पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे स्वत: हॉटेलवर आले व त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
शाखा अध्यक्ष पदाकरिता या निवडीची प्रक्रिया झाली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे दोन सप्टेंबरपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीआधी (Nashik Municipal Corporation elections) त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यामधील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या महापालिका निवडणुकीकरिता मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे व पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. राज ठाकरे आता पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर ते मान्यतेचा ठसा उमटविणार असल्याचे समजते. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यात निवडणुकाची तयारी सुरू
राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये अठरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, पनवेल, नाशिक, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, नागपूर अमरावती, अकोला, लातूर व चंद्रपूर यांचा समावेश आहे. आता या निवडणुकांच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप व राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे या महापालिकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.