बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नसिरुद्दीन शाहने (Naseeruddin Shah) नुकतंच अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या राजवटीनंतर भारतीय मुस्लिमांनी केलेल्या वक्तव्यावर केलेले भाष्य तुफान व्हायरल झाले. आता त्यांनी सांगितले आहे की, बॉलिवूडचे काही मोठे चित्रपट निर्माते आणि अभिनेते कसे प्रो-इस्टॅब्लिशमेंट्स (Filmmakers and Actors Pro-Establishments) चित्रपट बनवतात. ते म्हणाले की, त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही की चित्रपट निर्माते व कलाकारांना प्रो-इस्टॅब्लिशमेंट्स चित्रपट बनवण्याकरिता क्लीन चिटचे आश्वासन दिले जात आहे, मात्र त्यांना वाटतं की, सध्या ज्या प्रकारे चित्रपट बनवले जात आहेत त्यावरून हे स्पष्ट होते.
मोठे लोक मूलतत्त्ववादाचा अजेंडा लपवू शकत नाहीत
नसिरुद्दीन यांनी असे सांगितले की, “सरकार समर्थक व प्रिय नेत्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांना सरकारकडून चित्रपट बनवण्याकरिता प्रोत्साहित केलं जात आहे. याकरिता त्यांना आर्थिक मदतदेखील दिली जाते. यातच जर त्यांनी असे चित्रपट बनवले तर त्यांना क्लीन चिटचे आश्वासन दिल जात आहे. मोठे लोक मूलतत्त्ववादाचा अजेंडा लपवू शकत नाहीत. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते शाह यांनी हे स्पष्ट केले की, मुस्लिम असल्यामुळे त्यांना या क्षेत्रात कधीही भेदभावाची वागणूक मिळाली नाही, परंतु त्यांनी असेही नमूद केले की, इंडस्ट्रीमधील कलाकारांना त्यांच्या मनामधील गोष्टी बोलण्याकरिता त्रास दिला जातो. त्यावेळी प्रसिद्ध ‘तीन खान’नी गप्प राहण्याचा निर्णय का घेतला? याबाबत बोलताना नसिरुद्दीन म्हणाले की, मी त्यांच्याबाबत बोलू शकत नाही, मात्र त्यांना किती त्रास होईल याची कल्पना मी करू शकतो. “ते (खान) त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकाराबाबत चिंतेत आहेत. त्यांच्याकडे गमावण्यासारखे फार काही आहे.
कोणी बोलण्याची हिंमत करतो, त्याला त्रास दिला जातो
ज्येष्ठ अभिनेते पुढे म्हणाले की, हा फक्त आर्थिक छळ नसून तो कोणत्याही प्रकारची मान्यता गमावण्याचा असू शकतो, मात्र त्यांच्या संपूर्ण आस्थापनांना त्रास देण्याची ही बाब असेल. ते पुढे म्हणाले की, जो कोणी बोलण्याची हिंमत करतो, त्याला त्रास दिला जातो. हे केवळ जावेद साहेब अथवा मी नाही, तर कोणीही असू शकते. जे या उजव्या विचारसरणीच्या विरोधात बोलतात त्यांना त्रास होतो.” नसिरुद्दीन शाह जवळजवळ ५ दशकांपासून भारतीय चित्रपट इंडस्ट्रीचा भाग आहेत व त्यांनी ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘मिर्च मसाला’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘जुनून’, ’मंडी’, ’अर्धसत्य’, ‘जाने भी दो यारो’ यांसारखे काही उत्तम चित्रपट केले आहेत. त्यांच्या चित्रपटांकरिता त्यांना सन्मानितदेखील करण्यात आले आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.