रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची आणखी एका मानाच्या पदी वर्णी लागली आहे. (NCCS Member Uday Samant) माननीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री, भारत सरकार यांनी ना. उदय सामंत यांची सोसायटी ऑफ NCCS चे सदस्य म्हणून तीन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र हि भारत सरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाची एक स्वायत्त संस्था आहे.

स्रोत: रत्नागिरी खबरदार
हि संस्था बायोटेक्नोलॉजीच्या विविध क्षेत्रात मुलभूत संशोधनात आघाडीवर आहे. विशेषत: कर्करोग, चयापचय विकार, संसर्गजन्य रोग आणि पुनरुत्पादक औषध यासारख्या महत्त्वाच्या मानवी आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या संशोधनात या संस्थेला जगभरात मान्यता मिळाली आहे. याच संस्थेने कोविड-19 लसींची चाचणी घेण्यासाठी लस चाचणी सुविधा स्थापन केली होती.

अशा या नामांकित संस्थेने ना. उदय सामंत यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. “मला विश्वास आहे की तुमचा अफाट अनुभव, कौशल्य आणि ज्ञान आम्हाला NCCS चे वैज्ञानिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि राष्ट्राची सेवा करेल” अशा शब्दात या संस्थेचे संचालक मनोजकुमार भट यांनी ना. उदय सामंत यांच्याप्रती आपला विश्वास नियुक्ती पत्राद्वारे प्रकट केला आहे. (NCCS Member Uday Samant) ना. सामंतांच्या या नियुक्तीमुळे उभ्या महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.