देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (NEET PG-2021) अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासाठी समुपदेशनाची सुरुवातीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटरवर दिली. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच समुपदेशनाच्या बाजूने निकाल दिला.
