नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/संघर्ष गांगुर्डे – मध्ये रेल्वेने नागरिकांच्या सेवेत गारेगार एसी लोकल सेवा आणली त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नोकरदार वर्गाला एसी लोकलमुळे चागला दिलासा मिळालेला दिसून आला आहे.एकंदरीत नोकरीवर जाण्याच्या वेळेत या लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची दिसून येत आहे.त्यामुळे या लोकलच्या सेवेत वाढ व्हावी आशी मागणी प्रवाशान कडून होताना दिसली आहे.त्यातच उद्या पासून मध्ये रेल्वेने उद्या पासून एसी लोकल सेवेच्या आणखीन १० फेऱ्या वाढविल्या आहे. यातील आठ फेऱ्या या जलददोनसणार आहेत तर दोन फेऱ्या या धीम्या असणार आहेत.
मध्य रेल्वे 19/8/2022 पासून पुढील नॉन-एसी सेवा बदलून आणखी 10 एसी लोकल सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे एसी लोकल सेवेची एकूण संख्या दररोज 66 होणार आहे. तथापि, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय सेवांची एकूण संख्या केवळ 1810 राहील. या 10 सेवांपैकी एक सकाळच्या पीक अवर्समध्ये आणि एक संध्याकाळी पीक अवर्समध्ये असेल. रविवार आणि नामांकित सुट्टीच्या दिवशी या एसी लोकल धावणार नाहीत. सह सेवा सध्याच्या वेळापत्रकानुसार रविवार/नामांकित सुटीच्या दिवशी नॉन-एसी म्हणून चालतील.
पुढील प्रमाणे असतील एसी लोकलच्या फेऱ्या
T-36* सीएसएमटी फास्ट लोकल ठाण्याहून 08.20 वाजता सुटेल
BL-9* बदलापूर फास्ट लोकल CSMT 09.09 वाजता सुटेल
BL-20* CSMT फास्ट लोकल बदलापूरहून 10.42 वाजता सुटेल
K-51 कल्याण फास्ट लोकल सीएसएमटीवरून 12.25 वाजता सुटेल
K-62 CSMT फास्ट लोकल कल्याणहून 13.36 वाजता सुटेल
T-83 ठाणे स्लो लोकल CSMT 15.02 वाजता सुटेल
T-96 CSMT स्लो लोकल ठाण्याहून 16.12 वाजता सुटेल
BL-35* बदलापूर फास्ट लोकल सीएसएमटीवरून 17.22 वाजता सुटेल
BL-54* CSMT फास्ट लोकल बदलापूरहून 18.55 वाजता सुटेल
T-129 ठाणे फास्ट लोकल सीएसएमटीवरून 20.30 वाजता सुटेल
प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्ये रेल्वे कडून करण्यात आले आहे. मात्र प्रवाशांशी या वाढलेल्या फेऱ्याच्या बाबतीत विचारणा केली असता. सकाळी नोकरीला जाण्याच्या वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फेऱ्या वाढविल्या असत्या तर सकाळी एसी लोकलला होणारी गर्दी कमी होईल व आम्हाला प्रवास करणे सुखकर होईल अशा प्रतिक्रिया प्रवाशांच्या दिल्या. यावरून या १० फेऱ्या जरी उद्या पासून वाढविण्यात येणार असल्या तरी या फेऱ्याचे वेळापत्रक बघता प्रवाशांमध्ये निराशा दिसत आहे.