‘देवमाणूस’ मालिका होण्याची चर्चा असतानाच आता या मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री झाली आहे. ‘देवमाणूस’ मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही मालिका आता नव्या वळणावर आहे.
देवीसिंग उर्फ डॉ.अजितकुमार देव हा पुन्हा एकदा गावात परतलाय. आणि आता चंदाच्या येण्याने तो बिथरलाय. मालिकेत आता यापुढे काय होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
चंदा देवीसिंगला धडा शिकवण्यासाठी आली असली, तरी देवीसिंगचे कारनामे काही बंद झाले नाहीएत. मालिकेत आणखी एक नवीन एंट्री झाली आहे.’देवमाणूस’ मालिका टीआरपीच्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे. सोशल मीडियावर या मालिकेची नेहमीच चर्चा सुरू असते.
Credits and Copyrights – lokshahinews.com