मुंबई : 2021 वर्षाच्या अखेरीस अनेक लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडतात. त्यात 25 ते 31 डिसेंबरला पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. पण अशाने पुन्हा रुग्ण संख्या वाढू शकते. तसेच पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं तर त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सरकार या काही दिवसात निर्बंध कठोर करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यात आज टास्क फोर्स व महाराष्ट्र सरकार मंत्री अधिकारी यांची बैठक पार पडतेय त्यात काही निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आता हे 2021 वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यात या सरकारचा काय प्लॅन असण्याची शक्यता आहे वाचा.
सध्या राज्यभरात ओमायक्रॉनचा धोक वाढत आहे, त्याचे गुणधर्म समजून घेऊन आगामी आठ-दहा दिवसांत निर्बंधांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.त्यानुसार आता येत्या कॅबिनेट बैठकित, हे आघाडी सरकार राज्यात नवीन नियम बनवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजित पवार काय म्हटले निर्बंधाबाबत…
परदेशातून आलेल्या ज्या प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यांच्या घरातील लहान मुलांनाही संसर्ग झाला आहे. त्यामुळेच केंद्रसरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे. “गेल्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातील काही राजकीय लोकांच्या घरात विवाह सोहळे पार पडले. या सोहळ्यांमध्ये मोठी गर्दी जमली होती. हा ओमिक्रॉनचा विषाणू फार वेगाने पसरत असल्याच सांगितलं जात आहे. म्हणूनच देशपातळीवरुन सर्व राज्य, नागरिकांना यासंबंधीचं चित्र स्पष्ट करणं गरजेचं आहे. ओमाक्रॉनबद्दल देशपातळीवर निर्णय झाल्यास सर्व राज्यही त्यांच्या पातळीवर पुढील पावले उचलतील, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले बैठकीनंतर निर्णय
कोरोना व्हायरसचा नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यातही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागही अलर्ट झाली आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील ओमायक्रॉन परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यातच सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यामध्ये ओमायक्रॉन संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात आज रात्री होणाऱ्या बैठकीत ओमायक्रॉन आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे
पर्यटकांनी निर्बंध पाळले तर कुठेही अडचण येणार नाही
राज्य शासनाने आणि स्थानिक प्रशासनानं घातलेले निर्बंधाचं पालन केलं तर पर्यटन सुरू राहिल, वर्षाअखेरीस राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात होत असतं सध्या रुग्णांची संख्या नियंत्रित आहे. पर्यटकांनी निर्बंध पाळले तर कुठेही अडचण येणार नाही असे मिलिंद बोरिकर, संचालक, पर्यटन यांनी सांगितले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.