सिंधुदुर्ग : राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. यावर आज न्यायालय निर्णय देणार आहे.
१८ डिसेंबरला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर हल्लाप्रकरणी ६ संशयितांना अटक केली. ‘स्वाभिमान’चे पुण्यातील कार्यकर्ते सचिन सातपुतेंच्या अटकेनंतर पोलिसांची चक्रे आ. राणे व संदेश सावंत यांच्या दिशेने फिरली. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयात अपूर्ण राहिलेली सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, कामात व्यस्त असल्याने पोलीस ठाण्यात हजर राहू शकत नाही; आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधू शकतो, अशा आशयाचे पत्र राणे यांच्या वतीने पोलिसांना दिल्याचे समजते.
राणेंचे वकील, सरकारी वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी
यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने तिघे तर नीतेश राणे यांच्यावतीने सहा वकिलांची फौज होती.