मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा सवाल-जवाबाला सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन भाजपवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मुंबई मॉडेलवर बोला, असा सल्ला त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
गुजरातचा मुख्यमंत्री का बदलाल हा आमच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई मॉडेलवर बोला ना… तुम्ही भर कोरोनाकाळात आयुक्त परदेशी यांची बदली का केली?, असा उलटसवाल नितेश राणे यांनी राऊत यांना विचारला. गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला ना…, आयुक्त परदेशीची का बदली केली होती ? मुंबई मॉडेलमध्ये इतके मृत्यू झालेलं आहेत. तुम्ही तुमच्या मुंबई मॉडेलवर बोलून जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या, असं नितेश राणे यांनी ट्विट करुन संजय राऊतांना डिवचलं आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.