नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील या दौर्यात सहभागी होणार आहेत.
दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून शहराच्या तीनही विभागांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकांमध्ये पदाधिकार्यांशी चर्चा आणि शाखा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मनसे कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची लगबग आहे. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली.
एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. अनेक जण असल्याने तीन ठिकाणं बैठकी आहेत. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राजसाहेब सगळीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शाखा अध्यक्ष महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद नाही. शाखाध्यक्ष महत्वाचा आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.
आम्ही आमचे काम करत राहणार. मुंबईत,पुणे,नाशिक सगळीकडे बैठक आहे. लोकांना कळलं की मनसेने किती काम केले आणि आमचे काम किती मेंटेन केले. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. मुंबईमध्ये खेळायला गार्डनदेखील कमी आहेत. सत्तेत आल्यावर सगळं करू, असं आश्वासन अमित ठाकरे यांनी दिलं.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.