पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार शहरात स्वातंत्र्यदिनापासून शहरात ह्यनो हेल्मेट नो पेट्रोलह्ण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत पेट्रोल भरताना हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर या नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला हेल्मेट नसलेल्या चौघा दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन मारहाण करणाऱ्या संशयितांची ओळख पटवून तीघांना अटक केली आहे.no helmet, no petrol
दरम्यान नाशिकमध्ये दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर विना हेल्मेट पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांकडे येथील कर्मचाऱ्याने हेल्मेटची विचारणा करत युवकांना पेट्रोल देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरत चौघा जणांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन मारहाण करणाऱ्या संशयितांची ओळख पटवून तीघांना अटक केली आहे.पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.सोशलमिडियावरुन सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत संशयितांची ओळख पटवून संशयित मंगेश भास्कर पगारे (२६), मयुर त्र्यंबक देवकर (२५, दोघे रा.स्नेहनगर, म्हसरुळ) आणि अक्षय अविनाश जाधव (२६,रा.पेठरोड) या तीघांना बेड्या ठोकल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.no helmet, no petrol
म्हसरूळ शिवारातील ज्या पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली त्याठिकाणी पोलीस कर्मचारी त्यावेळी बंदोबस्तावर हजर नव्हते.
काय आहे उपक्रम :
अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आजपासून शहरात ‘नो हेल्मेट – नो पेट्रोल’ उपक्रम राबवणार आहेत. ‘सर सलामत, तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांच्या संकल्पनेतून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा उपक्रम पुढे आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संमतीने हा उपक्रम शहर पोलिसांनी हाती घेतला असून त्याचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनापासून करण्यात आला आहे. यामुळे आता पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल मिळू शकणार आहे.शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे पेट्रोल पंपांवर बॅनर लावण्यात आले.no helmet, no petrol
Credits and copyrights – nashikonweb.com