मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणले पाहिजे. मुसलमानांनाही इथले सगळे आपलेसे वाटायला हवे. तेही इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. फाऊंडेशनच्या वतीने आज खडकवासलालगतच्या बहुली या ठिकाणी आगीत भस्मसात झालेली सोळा घरे बांधून देण्यात आली. ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
येणारा प्रत्येक जण हा जाणार आहे
“सगळ्या गोष्टी सरकारच्या भरवशावर शक्य नाही. जेवढे जमेल ते प्रत्येकाने करावे, असे सांगत काश्मीरमध्ये वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. तेही आपले असून, दोन-तीन पिढ्यांपूर्वी कन्व्हर्ट झालेत. सगळ्यातला माणूस शोधायला हवा, येणारा प्रत्येक जण हा जाणार आहे. याच्यावर विश्वास ठेवून चांगले काम करायला हवे”, असेही नाना पाटेकर म्हणाले.
एक दिवस जाणार आहोत, यावर आपण कधी विश्वास ठेवणार
“संपत्तीचा किती संचय करणार आहोत आपण. एक दिवस जाणार आहोत यावर आता आपण कधी विश्वास ठेवणार आहोत. माझ्या सातबाऱ्यावर इतके आहेत, तितके आहेत. असे लोक सांगतात, परंतु माझ्या सातबाऱ्यावर खूप लोक आहेत, असेही मी अभिमानाने सांगतो”, असे नाना म्हणाले.
पैसे हे योग्य कामाला लागतात, लोकांचा विश्वास
“नामला आतापर्यंत खूप लोकांनी पैसे दिले आहेत. लोकांना विश्वास आहे की, नामला दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होणार नाही. याची मला ग्वाही देण्याची गरजच नाही. किंबहुना ती पडणारही नाही, कारण त्यांचे पैसे हे योग्य कामाला लागतात, हा लोकांना विश्वास वाटतो”, असेही नाना म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.