मालवण : मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सेवा देणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीच्या तिकीट दरात मेरिटाईम बोर्डाने १० रुपये एवढी वाढ केली असून आता तिकीट दर प्रतिप्रवासी १०० रुपये एवढा झाला आहे.

याबाबत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून, गेली दोन वर्षे कोरोना महामारी व लॉकडाऊन यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या होडी व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

लहान मुलांच्या तिकीट दारात कोणतेही वाढ करण्यात आली नसून त्यांचा तिकीट दर ५० रुपये इतका आहे. प्रौढांसाठी तिकीट दर १०० रुपये एवढा झाला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.